पत्ता
कोल्हापुर रोड, सांगली -४१६४१६
संस्थेने तत्पर सेवा, अंतर्गत नियंत्रण, तंत्रज्ञान विकास, समाधानकारक अंतर्गत व्यवस्था, मनुष्यबळ विकासावर भर दिला आहे. परिणामस्वरूप संस्थेच्या सेवेमध्ये चांगली सुधारणा झाली आहे.यामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
सर्व पहा
ठेवी – १२४६ कोटी १३ लाख
आपले स्वागत आहे
आज या पतसंस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. यामध्ये सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, संस्थेस वेळोवेळीभेटी देणारे मान्यवर व हितचिंतक यांचा मोलाचा वाट आहे. या आर्थिक अहवालात वर्षात पतसंस्थेने प्रगतीची गरुड झेप घेतली आहे. अहवाल अखेर वर्षात सभासद वसूल भाग भांडवल रु . ४३ कोटी ०६ लाख असून, ठेवी रु . १२४६ कोटी १३ लाख आहेत.
सभासदांना विविध कारणांसाठी रु. ९५३ कोटी ०६ लाख कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. अहवाल वर्षात आवश्यक त्या सर्व तरतुदी करून १५ कोटी ८९ लाख इतका विक्रमी निव्वळ नफा झालेला आहे, या वर्षी सभासदांना 15% (शिफारस) प्रमाणे लभाश वाटप करण्याचे आम्ही सर्व संचालकांनी ठरविले आहे. भविष्य काळात संस्थेच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना राबविण्याची आमची संकल्पना आहे.
अहवाल वर्षात पतसंस्थेचे सर्व सहकारी, संचालक मंडळाची मोलाची साथ, त्याचप्रमाणे सचिव यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळलेला कार्यभार या सर्वांमुळे पतसंस्थेची प्रगती साध्य करण्यास यशस्वी झालो. यापुढे पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये आपण सर्वांनी मोलाचे सक्रिय योगदान देऊन हा वटवृक्ष फोफावण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहू या, असे आपणासार्वाना मनपूर्वक आवाहन करून मार्च २०२५ अखेरचा वार्षिक वृत्तांत ताळेबंद व नफा – तोटा पत्रके आपणासमोर मांडण्यात आला आहे.
शाखा
एकूण ठेवी
एकूण कर्ज
सुखी ग्राहक
संपर्क
कोल्हापुर रोड, सांगली -४१६४१६
www.kbpsangli.com